Saturday, June 4, 2016

माझ्या स्वप्नातील परी ...!!!


अशीही असेल प्रेमाची  व्याख्या
एक कृष्ण आणि एक राधा.....
एका हृदयावरील दोन नावे
एक मी आणि एक तू.....

काय वर्णन करावे तुझ्या सौंदर्याचे
जसे शब्दातून वर्णिता येत नाही वैशिष्ट्य ताजमहालाचे.....
काजळ असतं शोभा देण्यासाठी डोळ्यांना
सुखावले ते स्पर्श करून तुझ्या नयनकमलांना.....

नाजुकशा चेहऱ्यावर हास्याची खळी
पाहून ती माझ्या मनी फुलली होती कळी.....
काळेभोर केस तुझे उडती वाऱ्यावरी
नजर न थांबे माझी ... गेलो मी स्वप्नांघरी.....

अडकलो असा मी तुझ्या प्रेमाच्या वादळात
बाहेर पडण्याची आशा राहिली नाही मनात.....
तुझ्या पापण्यांच्या उघडण्याने माझी सकाळ होते
तू स्वप्नांत असताना रात्र देखील लहान होते.....

धडपड केली जी बघण्यासाठी तुला
लक्षात आलं तुझ्यासाठी बंक केलेले लेक्चर संपले आहे केव्हाच.....
आज वाटत का घेतले मेकॅनिकल? नि कशासाठी ?
असते जर सिविल ... बांधले असते आठ ताजमहाल आठ सेम साठी.....

१४ फेब्रुवारीला केला होता विचार
बोलून टाकीन सगळ तुझ्यासमोर आज.....
पण झाली आधीच निराशा माझी
जेव्हा पहिले तुझे हाथ दुसऱ्याच्या हाती.....

नाही जग मला दिसले
अश्रुनी भरले होते जे डोळे.....
ना गुरुवार ना सोमवार
तरी घडला होता मला उपवास.....

परीक्षा असली तरी बंद करतो मी लाईट
तरी त्या दिवशी घडली माझी नाईट.....
मनातली कळी माझी कधीचीच कोमजली
जेव्हा कळले तू न राहिली माझी.....

आता नाही म्हंटल तरी प्रेम म्हणजे भावना
मात्र याच  प्रेमात सहन कराव्या लागल्या मला यातना.....
तर कधी प्रेम वाटत कटू सत्य
दगा दिल्यावरही हळहळलेल्या मनाचं नृत्य.....

कधी आकाशात आलेल्या ढगांचे सावट
जणू कालच सुरु झालेल्या प्रेमाचा हा शेवट.....
जरी भंगले स्वप्न माझे
तरी पूर्ण करीन मी स्वप्न आई वडिलांचे.....

सकाळ झाली सोनेरी किरणांनी
नवी उमंग जागी झाली मनातून.....
प्रेमाचे गणित तर चुकले होते
म्हणून सेम २ चे गणित सोडवत बसलो.....
  
            - अतिश शिवाजी घोंगे