इच्छा असुनही मनी,
होत नाही काम कसे....
सगळे सांगती मला,
प्रयत्नांती परमेश्वर....
अरे परमेश्वर तर भेटला मला ....पण प्रयत्न कुठेतरी हरवूनच गेले.
म्हणूनच की काय, परमेश्वर सोबत असूनही काम कसे अपूर्ण ??
सगळे सोबत घेऊन बसतो मी कामाला, पण प्रयत्न करण्यापूर्वीच आठवते मला दुसरे काम....
आणि मग पहिल्या कामाचे काय.... ते काम राहते अपूर्णच...
अन् मग कंटाळा आला म्हणून, दुसरे काम ही ठेवतो तसेच....
अनेक पुस्तके चाळली मी त्यासाठी.... माझ्या सोबतच असे का होते?
पुस्तके वाचता वाचता कळते मनी, इचछाशक्ती सर्वात मोठी शक्ती .....!!!
अरे, डोक्यात इच्छा तर असते,
पण अंगातील शक्ती कधीच हरवून गेलेली असते....
मग विचार येतो मनात, काय कामाची ती इच्छाशक्ती...
तरीपण मी विचार केला.... आयुष्यात खूप पुढे निघून आलोय मी...
कशाच्या जोरावर???.... मी तर प्रयत्न केलेच नाही....
मग रावडी राठोड चित्रपटातील अक्षय कुमार सारखा डोक्याचा रीमाइन्ड बटन मी दाबला ...
आणि मला एक गोष्ट लक्षात आली...
फक्त एकाच शक्ती आहे मजजवळ ,
" जे काम करीन, ते नक्कीच इतरांपेक्षा वेगळे करेल "
मग काहीही काम असो, ते इतरांपेक्षा चांगले आणि भन्नाट असले पाहिजे ...!
म्हणून की काय..... मेहनत नसे अंगी तरी फळ देतो ईश्वर...
पण तरी पण कधी कधी काही तरी अनपेक्षित घडते....
सोबत चालणारे माझे सवंगडी अचानक पुढे निघून जाती...
मी जीवनाच्या शर्यतीत कुठेतरी पाठी पडलो...
मग अचानक मनात विचार येतो...
" ती WINNING TROPHY दूर नव्हती माझ्यापासून...अगदी समोरच दिसत होती,
पण मी पळायचेच विसरलो रे भगवंता.... "
त्यात तुझी काय चुकी देवा ? थोडेसे प्रयत्न केले असते तर आज मी कुठे असतो ?....
नक्कीच एक यशस्वी माणूस झालो असतो....
एक दररोजच्या जीवनातील उदाहरण घ्या ना... वडापाव सगळ्यांनाच आवडतो...
वडापाव वाल्याने वडा किती ही भारी बनवला तरी तिखट गोड चटणी शिवाय त्या वडापाव ला मजा येत नाही...
त्याचप्रमाणे मी यशस्वी नाही आहे असे नाही....पण त्या यशामध्ये काही तरी बाकी आहे हे नक्कीच .....
आणि ते काय आहे हेच कळत नाही आहे ...??
पण एक दिवस येईल आयुष्यामध्ये ज्या दिवशी मी ते जरूर शोधेल.....
तसे तरी कोणी थोर व्यक्तीने म्हंटले आहे...
" काळ्याकुट्ट रात्री नंतर प्रकाशमय सकाळ आहे..... "
म्हणूनच मग माझे अशांत मन शांत होते... जसे एखादया वाटसरूला वादळी पावसात झाडाचा आधार....
सगळे जण म्हणतात... " जर आपल्या मार्गातील एक दरवाजा बंद झाला तर दहा दरवाजे उघडतात.... "
खरोखर दहा दरवाजे उघडतात की नाही हे मला माहीत नाही..
पण एवढे मी ठामपणे सांगू शकतो एक दरवाजा बंद झाला,
तर थोड्या अंतरावरील दुसरा दरवाजा नक्कीच उघडतो.....
बस मला आता त्या दरवाज्या पर्यन्त कसे ही करून पोहचायचे आहे....
कोणत्याही परिस्थिती... कोणत्याही अवस्थेत....
त्यासाठी मी माझ्या आयुष्यातील काहीही मौल्यवान वस्तू गमवायला तयार आहे....
ह्या विचाराने ने काम केल्यावर नक्कीच देव पण मदत करेल...
चुकून एकदा-दोनदा हार भेटेल पण .... पण घाबरायचं काही कामाचं नाही.... "
हार पण पत्करून पहा... हरल्यानंतर परत एकदा जिद्दीने उभे राहण्याची मज्जा काही वेगळी असते... "
रस्त्यात खडा आल्यामुळे पडणे साहजिक आहे. पण खड्यात पडलो म्हणून रडण्यात काहीच उपयोग नाही .. खड्यातून बाहेर कसे पडत येईल हा विचार केला पाहिजे...
आपण आपल्या अंगातील सगळी ताकत वापरल्याशिवाय बाहेरच निघूच नाही शकत ....
" हार आणि जित एकाच रस्सी चे दोन टोके ... एक उलटे केलं की दुसरे हातात येते...
बस ते टोक उलटे करण्याचे सामर्थ्य बाळगा अंगात... "
कधी कधी निराश असल्यावर खूप वाटते मनाशी,
जावे एका उंच डोंगरावर... आणि त्या डोंगराच्या सगळ्यात उंच शिखरावर चढून जोरात ओरडावेसे वाटते....
" माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला ...!!!!!! "
आणि मग त्या डोंगरातून येणार माझा प्रतिध्वनी अविस्मरणीय असेल....
सांगावेसे वाटते त्या भल्या मोठ्या डोंगराला, त्या लांब लचक नदीला,
सुंदर प्राण्यांना, पक्षांना..... अन् तिथल्या प्रत्येक झाडाला, झुडुपाला की....
" मी ही इतरांपेक्षा काहीतरी वेगले ,चांगले आणि अविस्मरणीय करू शकतो...!!!! "
मी एक ना एक दिवस खूप भारी व्यक्तिमत्व बनेल, यशस्वी माणूस बनेल ..
असा माणूस की ज्याच्यावर त्याच्या आई-वडिलांना, बहिणींना , भाऊजींना, आप्तेष्टाना,
आणि सर्वात शेवटी मित्र-मैत्रिणींना गर्व वाटेल...
समोर जो उभा आहे ना तो आमच्यातलाच एक आहे...!!!!!
आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.... !!!!!
देव करो आणि असा दिवस सगळ्यांचाच आयुष्यात येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ....
तो दिवस येईल हे पक्का... पण मित्रानो मेहनत करायला विसरू नका. ..!
- अतिश शिवाजी घोंगे